spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान मध्ये नाकाबंदीत ५.८७ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

– पोलीसांची धडाकेबाज कारवाई; पिपरी व टेकडी येथील आरोपी ताब्यात

कन्हान :- शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या हालचालींवर आळा घालण्यासाठी कन्हान पोलिसांनी राबविलेल्या नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत ५.८७ किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली. ही कार वाई जुने पोलीस स्टेशन परिसरात दुपारच्या सुमारास करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार कन्हान शहरात संश यित हालचालींच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी संशयित व्यक्तींची तपासणी सुरू असताना दोन इसम शाईन दुचाकी क्र एम एच ४० ए जी ४२७६ वर संशयास्पद हालचाल करताना आढळुन आले. पोलिसांनी त्यांना थांबवुन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील स्कुल बँग मध्ये तब्बल ५.८७ किलो गांजा किमत १,१७,१८० रू. १ अँनाईड मोबाईल किमत १०,००० रू. १ किपँड मोबाईल किमत ५०० रू. साईन दुचाकी किमत ७०,००० रूपये असा एकुण १,९७, ६८० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींपैकी १) शैलेश बंसीलाल अकोने वय ४० वर्ष रा. पिपरी -कन्हान येथील तर २) निलेश उर्फ बिटटु रमेश भुते वय २८ वर्ष रा. महाजन वाडी टेकडी येथील रहिवासी असुन पोलिसांनी तत्काळ दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध कलम ८ (क), २०(ब) !! ब २९ एम डी पी एस अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाख ल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदरची कारवा ई पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्श नात पोलीस उपनिरीक्षक प्रविण हारगुडे, पोहवा हरीश सोनभद्रे, अमित यादव, अनिल यादव, आकाश खोब्रा गडे सह इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वि रित्या पार पाडली.

या कारवाईमुळे कन्हान परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असुन पोलिसांच्या या तत्पर तेचे नागरिकांकडुन स्वागत केले जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.