spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गट ग्रा पं खंडाळा (घ) (गहू हिवरा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील सीमेलगत असलेले व पारशिवनी तालुक्यातंर्गत येत असलेले गट ग्रा पं खंडाळा (घ) येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती माजी सरपंच तथा ग्रा पं सदस्य रविंद्र केने यांचा हस्ते मेणबत्ती प्रज्वलित , त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण , वंदन करून व उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून गावकऱ्यांचा उपस्थितीत उत्साहात साजरी केली.

याप्रसंगी उपसरपंच चेतन कुंभलकर, योगराज शेंडे, सूर्यकांत शेंडे, धनिराम उके, प्रभाकर मेश्राम ,लक्ष्मी  शेंडे, बनकर तसेच बाल गोपाल उपस्थित होते.

Popular Articles