spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लाखनी येथील वाघाये महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

– ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्रच प्रगतीचा आधार – प्रा. श्रद्धा बोरकर

हंसराज,भंडारा लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गणेश कापसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. बाबासाहेबांचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय विचार आजही देशाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले.

याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. श्रद्धा बोरकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील शोषित, दीन-दलित आणि पीडित बांधवांना ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मोलाचा मंत्र दिला. आज समाजातील प्रत्येक घटक बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात करून शैक्षणिक व सामाजिक प्रगती करत आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही लोकशाहीची मूल्ये बहाल केली आहेत.”

या कार्यक्रमाला डॉ. पुण्यशील टेंभुर्णे, डॉ. मनमोहन भैसारे, डॉ. मंगेश वंजारी, प्रा. सागर वारंगणे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच राकेश उके, सचिन बागडे, विजय शहारे, पिंटू हलमारे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. सागर वारंगणे यांनी मानले.

Popular Articles