spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सावनेरमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी आढावा बैठक; कामांना गती देण्याचे निर्देश

सावनेर :- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आज सावनेर येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीस सावनेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष, सभापती, नगरसेवक, तसेच नगर परिषद क्षेत्रातील सर्व बीएलओ (बूथ स्तरीय अधिकारी) आणि विविध राजकीय पक्षांचे बीएलएस (बूथ स्तरीय पर्यवेक्षक) मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान मतदार याद्यांच्या SIR कामाची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि त्यांना गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना SIR मोहिमेत अचूकता आणि वेग या दोन्ही बाबींना समान महत्त्व देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी प्रत्येक बीएलओने आपल्या कार्यक्षेत्रात घरोघर जाऊन पडताळणी करण्यावर भर देण्याचे सांगण्यात आले. पात्र मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सावनेरमधील नागरिकांनीही बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीच्या शेवटी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करत SIR मोहिमेचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Popular Articles