Thursday, April 23, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सुदीप जैस्वाल अडव्होकेट्स फाउंडेशन, चे स्थापनेची घोषणा – अँड सतिश उके

नागपूर :- स्व.अडव्होकेट्स सुदीप जैस्वाल यांचा वकील मित्र परीवार हा फार मोठा होता त्यांनी त्यांचे मिळकतीतील जास्तीत जास्त भाग वकिलांचे चळवळीवर खर्च केला कल्याणावर खर्च केला. सुदीप जैस्वाल यांनी वकीलांवर अरेरावी करणारे चुकीच्या शक्तीचा विरोध केला त्याकरीता व्यक्तिगत नुकसान सोसले, त्यांचेवर गुन्हे सुद्धा दाखल झाले त्यांनी वकीलांमध्ये अन्यायाचा विरोध करण्याची हिम्मत, आत्मविश्वास भरला इतिहास त्यांचे कामाला सदैव अमर ठेवेल. सुदीप जैस्वाल अडव्होकेट्स फाउंडेशन Sudeep Jaiswal Advocates Foundation चे स्थापना ही स्व.अडव्होकेट सुदीप जैस्वाल यांचा स्मृती व त्यांनी वकिलांच्या हक्काकारीता केलेली कामे पुढे तशीच सुरु राहावी हा त्याचा हेतु आहे. सुदीप जैस्वाल यांनी त्यांचे हयातीत आम्ही काही वकील मित्रांचे सोबत मिळून वकिलांचे हिताकरिता संस्था सुरु करण्याचा प्रयत्न केला होता, त्या संस्थेच्या नावात “Central India” हा शब्द असल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नोंदणी नाकारली होती. ती कामे नागपूरसह विदर्भातील वकील व त्यांचे परीवाराचे सदस्य यांचे करिता सुदीप जैस्वाल यांचे इच्छेप्रमाणे पुढे करणे हे आमचे उद्देश आहे. याकरीता सुदीप जैस्वाल अडव्होकेट्स फाउंडेशन Sudeep Jaiswal Advocates Foundation चे स्थापनेची घोषणा याद्वारे करण्यात येत आहे. यात ही संस्था विना फायदा तत्वावर काम करेल आणि त्यात अनेक उद्दिष्ठ पूर्ण करण्यात येथील त्यातील काही उद्दिष्ठ खालील प्रमाणे आहेत,

१. वकिलांचे करीता Time Bank सुरु करण्यात येईल यात कोणी वकील आजारी असेल, काही कामानिमित्य बाहेरगावी गेला असेल त्यांस शेतीची महत्वाची कामे असतील तेव्हा त्यांनी whatsapp / Email द्वारे पाठविलेले अर्ज संबधित न्यायालयात त्यांचे पक्षकारास संपर्क न साधता संस्थेचे इतर वकील सभासद पोहचवून देतील हा वेळ त्या पोहचवून देणारे वकील यांचे खात्यातजमा करण्यात येयील व त्यास तो जेव्हा त्यांचे करीता असे काम करावयाचे आहे तेव्हा वापरण्यात येईल. किवा ही सेवाघेणारे सभासद अन्य प्रकारे त्याची परतफेड करू शकतील.

२. वकिलांचे करीता नागपुरात कोठेही वकीलभवन नाही, Gymkhana, Recreation club Consumer society नाही. त्याची स्थापना करणे जेथे वकिलांना सवलतीच्या दरात व सन्मानाने सुख सोयी मिळतील बाहेरगावचे वकिलांना तेथे सवलीच्या दरात निवास सोय मिळू शकेल अशी व्यवस्था करणे.

3. वकिलांचे करीता Cricket Ground बनविण्याचे काम सुरु आहे त्याकरीता सुदीप जैस्वाल यांचे पत्नी यांनी ७ एकर जमीन नागपूर ग्रामीण भागात विकत घेतली असून ते Sudeep Jaiswal Advocates Foundation ला वापरण्याकरीता देण्याचे त्यांनी वचन दिले आहे येथे सुद्धा Gymkhana, Recreation club बनविण्यात येईल सुदीप जैस्वाल यांची” Advocates 11″ Team ही पुन्हा मजबूत करण्यात येईल

४. सर्व क्षेत्रातील, भ्रष्टाचारी अपात्र अकार्यक्षम कामचोर आळशी काम टाळणारे घाबरट अधिकारी यांचे अश्या कृत्यांचा Data Base वकील सदस्यांचे उपयोगाकरीता तयार करण्याचे काम व याकरीता महाराष्टातील सर्वच वकील संघठना व बार असोसीएशन यांचे कडील माहिती व त्यांनी केलेली त्याबाबतील केलेली निवेदने व कारवाई याची माहिती त्यात ठेवण्यात येईल तसेच येथील वकील अन्य जिल्ह्यात काही कामा करीता गेल्यास त्यांना सहकार्य व आवश्यक मदत मिळणेस किवा अन्य जिल्याचे ठिकाणी त्यांचेवर काही समस्या आल्यास त्याचे निवाकरण होणेस त्यांना मदत मिळावी याचे करीता प्रयत्न करणे तेथील वकील मित्र संगठन यांचेशी तशे सबंध बनविणे हे काम हे Foundation करेल

५. Foundation चे सदस्य कोणी वकिलाचे दुर्दैवी काही झाल्यास त्याचे त्याचे परिवाराला सर्व कायदेशीर मदत करतील त्याचेवर इतर कोणी त्यांची संपत्ती बळकाविणे, त्यांना दमदाटी करणे, अन्याय करणे हे होवू नये याची काळजी घेतील या बदल्यात ते फी किवा अन्य कसेही व काहीही प्रकारे मोबदला घेणार नाहीत.

६. करतील. या Foundation करीता सदस्य हे त्याचेपरी देणगी व सहकार्य व श्रमदान करून हे काम सुरु

७. वकिलावर होणारे सर्व अन्याय यांचे व कर्तव्यनीष्ठ न्याय क्षेत्रातील अधिकारी होणारे अन्याय यांचे विरुद्ध आवाज उचलणे हे काम या Foundation करीता सदस्य करतील.

८. वकिलांनी कोर्ट अधिकारी म्हणून न्यायालयात व सरकारी अधिकारी यांचे समोर बाजू मांडताना उभे तासोन तास उभे राहणे, ही त्यांना एकप्रकारची शिक्षा होते. कधी कधी वकील थकल्याने पक्षकाराची बाजू बरोबर मांडू शकत नाही त्याचे लक्ष शाररीक त्रास शाररीक अकडण या कडे असते त्यामुळे ते बाजू बरोबर मांडू शकत नाही, वरिष्ठ वकील यांना हा त्रास फार होतो, यामुळे पक्षकारास न्याय मिळवून देण्यात वकिलाचे कडून कमी आपोआप ना इलाजाने राहते. उभे राहून बाजू मांडणे हा मा.न्यायालयास सन्मान आहे ते प्रचलन आहे मात्र कोणत्याही कायद्यात तसे बंधन नाही, Advocates Act or Bar Council of India (BCI) guidelines मधेही नाही ते etiquette चा भाग आहे काही न्यायालयात वकिलांना बाजू मांडताना त्यांचे फाईल ठेवण्याचीही जागा नसते काही इतर देशांमध्ये असलेल्या पद्धती प्रमाणे व सोबत भारतीय पद्धती प्रमाणे बाजू मांडताना सुरवातीलाच मा. न्यायालयास उभे राहून मा. न्यायालयास सन्मान देवून जास्त वेळेची बाजू मांडताना बसून बाजू मांडण्याची नियमावली suo moto तयार करण्याकरीता व असे प्रकारचे सुधार याबाबत मा.सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांना निवेदनाद्वारे याचीका द्वारे करणे या प्रकारचे सुधार करीता प्रयत्न करणे हे काम या Foundation करीता सदस्य करतील.

९. वकीलांवरील हल्ले, Bar Council व पोलिसात खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे विरोधात दंडनीय कायदा तयार करण्याकरीता शासनास पाठपुरावा करणे. इत्यादि हेतु या Foundation च्या वकिलाचे कल्याणार्थ राहतील. या पत्रकार परिषदेला एड. कमल सतुजा एड तरुण परमार, अँड. सतीश उके, एड वैभव जगताप, एड. लूबेश मेश्राम, एड. कौशल त्रिवेदी, एड. नकुल परमार आणि सुनील चोखारे सह मान्यवर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com