Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खरीप 2026 साठी कामठी तहसील कार्यालयात तक्रार निवारण कक्ष 

कामठी :- खरीप 2026 हंगामात कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यासारख्या कृषी निविष्ठा खरेदी करताना येणाऱ्या अडचणी व गुणवत्तेबाबतच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कामठी तहसील कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय कामठी येथे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान कक्ष कार्यरत असून शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा एम आर पी दराने उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शेतकरी तालुका कृषी अधिकारी, कामठी यांच्या शासकीय क्रमांकावर संपर्क साधू शकतात. 9185231014 तसेच खते,बियाणे व इतर निविष्ठा विषयक तक्रारिंकरिता  सुभाष कणिरे, तालुका गुणनियंत्रण निरीक्षक यांच्या 9185231027 या शासकीय क्रमांकावर संपर्क साधू शकतात .

तसेच शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपल्या समस्या गावातच सोडून घ्याव्यात यासाठी कृषी विभागातील सर्व अधिकारी/ कर्मचारी कटिबद्ध आहेत.अशी माहिती कामठी तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे यांनी दिली.

खरेदी दरम्यान किंवा हंगाम संपे पर्यंत निविष्ठांच्या दर्जाबाबत संशय आल्यास शेतकरी कामठी तालुका कृषी कार्यालयातील तक्रार निवारण कक्षाकडे धाव घेऊ शकतात.

तक्रार करताना शेतकऱयांनी लेखी अर्जासोबत खरेदीची पक्की पावती,सातबारा उतारा ही कागदपत्रे जोडणे आवश्यक असून त्यावर स्वतःचा पूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा.शेतकऱ्यांना केवळ अधिकृत विक्रेत्याकडूनच निविष्ठा खरेदी करण्याचे आणि पावतीवर जात,लॉट नंबर ,उत्पादन दिनांक असल्याचे खात्री करून घ्यावे.सध्या खतांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नसून चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही कामठी तालुका कृषी विभागाने दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.