Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नगर परिषद खापा ची धडक कारवाई, कर भरल्याशिवाय काढले जाणार नाही मालमत्तांचे सील, व्यावसायिक मालमत्तांवर कारवाई

– नगरपालिकेचा इशारा : पुढील कारवाईत नळ जोडणी होऊ शकते खंडित

खापा, वार्ताहर :- थकीत मालमत्ता करापोटी खापा नगरपालिकेने शहरातील व्यावसायिक मालमत्तांना सील ठोकले आहे. यावर जोपर्यंत कर भरणार नाही, तोपर्यंत सील काढले जाणार नाही, असा इशारा नगरपालिकेने दिला असून, प्रशासनाने यातून कर चुकवेगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवल्याने मालमत्ता कराची विक्रमी वसुली झाली आहे.

नगरपालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात कर वसुलीला गती देत थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. नगर परिषदचे मुख्याधिकारी सचिन राऊत आणि प्रशासकीय अधिकारी वैभव गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारक व संकलक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. नगर परिषदने सुरू केलेल्या या धडक मोहिमेत व्यावसायिक मालमत्ता सील करण्यात आल्या. ही कारवाई पाणीपुरवठा अभियंता राहुल चव्हाण, चून्नीलाल बोरकर, संजय कुंभारे, समीर पठाण आदी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केली.

“प्रलंबित थकबाकीमुळे थेट सील करण्याची कारवाई”

त्यामुळे जप्ती टाळण्यासाठी अनेक थकबाकीदारांनी तातडीने कर भरण्यास सुरुवात केली. दरम्यान, अंदाजे चार लाख रुपयांच्या जवळपास थकबाकी असल्याचे समोर आले असून, कर न भरल्यामुळे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार थेट सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

“परस्पर सील काढल्या प्रकरणी होणार गुन्हा दाखल, कायदेशीर कारवाई”

नगर परिषदने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील विनापरवानगी अथवा परस्पर काढल्यास, या प्रकरणी संबंधित मालमत्ता धारकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

“अन्यथा होणार फेर लिल्लाव”

निर्धारित मुदतमध्ये कर भरणा न केल्यास सदर व्यावसायिक गाडा (कमरा) लिलावामार्फत अन्य व्यावसायिकाला देण्याची प्रकिया येणाऱ्या काळात करण्यात येईल. असा इशारा नगर परिषदेने दिला आहे.

“कोणत्याही कागदपत्रापासून राहाल वंचित “

थकबाकी असल्याने नगर परिषद मार्फत कोणतेही प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. नगर पालिका अधिकारक्षेत्रात येत असलेल्या कामाला त्रासदी होण्याची शक्यता आहे, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. थकबाकी न करता नियमित कर भरा आणि अश्या कारवाई पासून दूर राहा. नगर परिषदेला सहकार्य करा. असे आव्हान मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी केले आहे.

“पुढील कारवाईसाठी नगर परिषद सज्ज”

तसेच अनेक नळ धारकांनी मागील थकबाकी रक्कम न भरल्याने त्यांची नळ जोडणी ही खंडित करण्यात येणार असून, नागरिकांनी या मूलभूत सुविधा पासून वंचित न राहता, लवकरात लवकर नळ जोडणीचा कर भरणा करावे, अशी विनंती नगरपरिषद प्रशासन मार्फत खापा शहरातील जनतेला करण्यात आली आहे. अन्यथा कुणालाही न जुमानता नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगर पालिका प्रशासनाने दिला आहे.

– नगरपालिकेने थकीत कराचा भरणा न केलेल्या व्यावसायिक मालमत्ता सील केल्या आहेत. त्यापैकी काही मालमत्ताधारकांनी थकबाकी भरली. त्यानंतर त्यांचे सील काढण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. सचिन राऊत, मुख्याधिकारी, नगर परिषद, खापा.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.