Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तांत्रिक कामगार युनियनतर्फे रुग्णवाहिका लोकार्पण व मुख्यपत्र उर्जा भरारी प्रकाशन सोहळा कोल्हापुरात

नागपूर :- तांत्रिक कामगार युनियन (रजि.नं.5059) यांच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण व मुख्यपत्र उर्जा भरारी प्रकाशन सोहळा कामगार दिनाचे औचित्य साधून १ मे २०२६ रोजी, कोल्हापूर येथील, दिगंबर जैन बोर्डिंग हॉल, दसरा चौक येथे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी दिली आहे. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण व मुखपत्राचे प्रकाशन करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती मध्ये कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, कोल्हापर मंडळाचे अधिक्षक अभियंता गणपतराव लटपटे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती परिमंडळ कोल्हापुर सहा. महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, अजित असवले, संजय पोवार, वैभव गोंदिल, विजयकुमार आडके, अशोक जाधव तसेच जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, वरिष्ठ व्यवस्थापक अप्पासाहेब पाटील, व्यवस्थापक दीपक भोसले तसेच आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तांत्रिक कामगारांच्या सेवेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले जाणार आहे कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय कार्याध्यक्ष शिवाजी शिवनेचारी, उपाध्यक्ष बी आर पवार, गोपाल गाडगे, सतीश भुजबळ, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस आनंद जगताप, विलास डवर, विलास निमसटकर, केंद्रीय संघटक महेश हिवराळे, आर आर ठाकूर, अरुण यावले, मनोज मोरे, श्रीराम वाकचौरे , राज्य सचिव रघुनाथ तात्या लाड, प्रकाश निकम, संजय उगले, बाळासाहेब काटे, कोषाध्यक्ष गजानन अघम, नितीन चव्हाण, दत्तू भोईर, प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे, महिला प्रतिनिधी शुभांगी मुचडे, विवेक बोरकर, किरण करहाळे, प्रकाश वाघ, विक्की कावळे, प्रदीप पाटील, युवा तांत्रिक कामगार संसद मुख्य समन्वयक देवेंद्र साळुंके, महिला विंग प्रमुख नीता काबरा, सचिव मनीषा औंदे, निलेश चक्रपाणी, मंगेश चिमोटे यांनी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.