– स्वाधीनता ग्राम विकास देईल कौशल्य विकासाला प्रोत्साहन – सीए श्वेताली ठाकरे
नागपूर :- देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी संघ परिवाराचा बारा बलुतेदार पद्धतीवर विशेष भर देऊन महाराष्ट्रातील पारंपरिक बारा बलुतेदार पद्धतीला पुनरुज्जीवित करून राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर व्यवस्थेच्या लक्षात वाटा उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. कार्पोरेट कंपन्याच्या आक्रमणापासून आपल्या पारंपरिक कारागिरांचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना आर्थिक बळ देऊन स्वावलंबी बनविणे हाच आमचा प्रयत्न व उद्देश आहे. बलुतेदार समाजातील कारागिरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुद्रा लोन या सारख्या शासकीय योजनेतील लाभ मिळवून दिला जाईल. आणि स्वावलंबी समाज निर्माण होण्यास मदत होईल. बलुतेदार शाहीला भक्ती मार्गाने राष्ट्रवादाला बळ दिले व भारत देशाला एकजूट करण्यासाठी आर्थिक मजबुत करणे तसेच मराठा साम्राज्य, राजपूत आणि खालसा क्षत्रिय सेना बनविण्यासाठी वारकरी संप्रदायाचा मोलाचा वाटा होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण त्याला सक्षम करायला पाहिजेत. असा विश्वास श्वेताली ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पत्रपरिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष बी सी भरतिया, सचिव श्वेताली ठाकरे आणि फाउंडेशनचे सल्लागार अभिषेक देशपांडे यावेळी उपस्थित होते.

