Thursday, April 30, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

माहिती तंत्रज्ञान व आयटी सेवा, सायबर सिक्युरिटी डेटा अनॅलिटिक्स विशेष केंद्र म्हणून नागपूरचा विकास –  विजयलक्ष्मी बिदरी

· आयटी हब, विशेष सायबर एलिटिक्स ए आय म्हणून विकस कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर

· लाइफस्टाइल सिटी म्हणून नवी ओळख निर्माण व्हावी

· सायबर सिक्युरिटी, ए आय अभ्यासक्रमांची सुरुवात

· आयटी क्षेत्रातील नामवंत संस्था व शैक्षणिक संस्थांसोबत विचार मंथन

नागपूर :- नागपूर शहराला भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत एक प्रमुख माहिती तंत्रज्ञान आणि आयटी सक्षम सेवा केंद्र तसेच ए आय सायबर सिक्युरिटी व डेटा अनॅलिटिक्स विशेष सेंटर म्हणून विकसित करणे आवश्यक आहे त्यासाठी येथील पायाभूत सुविधा एअर कनेक्टिव्हिटी वर्किंग स्पेसेस तसेच तज्ञ मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी व्यक्त केली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महास्ट्राईड अंतर्गत नागपूरचा आयटी हब म्हणून विकास करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एका विशेष विचार मंथन बैठकीचे आयोजन महाराष्ट्र जागतिक बँक प्रकल्प यांचे मार्फत करण्यात आले होते, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना बिदरी बोलत होत्या.

नागपूर शहराचे भौगोलिक स्थान, मिहान प्रकल्प आणि सुधारित पायाभूत सुविधांमुळे आयटी हब म्हणून मोठी क्षमता असल्याने या क्षेत्रातील उद्योगपती, स्टार्टअप, शैक्षणिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांना एका व्यासपीठावर आणण्यासोबतच मूलभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगताना विभागीय आयुक्त  बिदरी म्हणाल्या की, मिहान व परिसरात आयटी कंपन्या तसेच खाजगी व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये मोठ्या संख्येने असल्यामुळे या परिसरात तज्ञ मनुष्यबळाची उपलब्धता आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणात उत्सुक असतानाच त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

आयटी उद्योग नागपुरात यायचे असेल तर दळणवळणाच्या सुविधा तसेच एअर कनेक्टिव्हिटी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी हैद्राराबाद, पुणे , चेन्नई आदी आयटी हबसोबत नागपूर जोडणे आवश्यक आहे. नागपूरला चांगली एअर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे उद्योजकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.

आयटी उद्योगासाठी मिहान तसेच परिसरात जागा उपलब्ध आहे परंतु उद्योजकांना जागा उपलब्ध होईल यादृष्टीने इज ऑफ डुइंग बिजनेस आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आयटी उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये रोजगार निर्मिती संदर्भात समन्वय ठेवून या उद्योगाला आवश्यक असलेले मनुष्यबळ जास्तीत जास्त कसे उपलब्ध होईल तसेच नागपूरमधील या क्षेत्रातील मनुष्यबळ परत नागपूरला कसे आणता येईल यावरही विचार मंथन आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एक कंपनी एक कॉलेज या धरतीवर आयटी कंपन्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करावी स्किल बिल्डिंग साठी कॉलेज ची निवड करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

 लाइफस्टाइल सिटी म्हणून ओळख

नागपूर शहराला आयटी हब म्हणून विकसित करण्यासाठी शहराचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. त्या दृष्टीने लाईफस्टाईल सिटी म्हणूनही विकसित करताना चांगले मॉल्स, सिनेमा थिएटर्स, पंचतारांकित हॉटेल्स, क्लब हाऊस आणि शहरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध शासकीय यंत्रणा यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.नागपूर शहराला टायर टू सिटी ऐवजी नेक्स्ट वेअर सिटी म्हणून ओळखले जावे अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटर उभारण्यासाठी आवश्यक सुविधा व प्रयत्न करण्याची गरज आहे त्यासाठी प्रमुख शहरांमध्ये रोडशो आयोजित करावे.

सप्लाय चेन, वेअर हाऊस, रोबोटिक सेंटर यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर होणाऱ्या समिटमध्ये नागपूरला प्रतिनिधित्व मिळायला हवे. त्यासोबतच सायबर सिक्युरिटी सेंटर उभारण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये त्या संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक आहे. नागपूर येथेच उद्योगांना लागणारे कौशल्य आणि मनुष्यबळासाठी आवश्यक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याची सूचना विविध उद्योग तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली. या विचारमंथन बैठकीमध्ये विदर्भ असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअरचे अमिताभ खन्ना, नेस्कॉमच्या विजया आगरकर, एआयडीचे डॉ. कपिल चंद्रायन, सीआयआयचे अध्यक्ष अमिताभ सिन्हा, वरिष्ठ आयटी मेंटोर शशिकांत चौधरी आदींनी सहभाग घेऊन आयटी हबसाठी जोरकस प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

प्रारंभी महास्ट्राइडचे प्रकल्प अधिकारी अजयकुमार व उद्योग तज्ञ रंजन पांढरे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती तंत्रज्ञान आणि आयटी सक्षम सेवेचे एक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांसंदर्भात माहिती दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मेहेरे तसेच उद्योग, मिहान, माहिती तंत्रज्ञान आदी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.