spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रोमन ही मराठीची लिपी असल्याचा जावईशोध लावणाऱ्या संजय राऊतांचे मराठीप्रेम बेगडी

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची सणसणीत टीका

रोमन लिपी ही मराठी भाषेची लिपी असल्याचा जावईशोध लावणाऱ्या संजय राऊत यांचे मराठीप्रेम निव्वळ बेगडी आहे. दररोज सकाळी पत्रकार परिषदेतील त्यांची एकंदर भाषा पाहता त्यांच्या मराठीचा आणि राजकारणाचाही स्तर किती खालावला आहे हे आपल्या लक्षात येते, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी राऊत यांच्यावर सणसणीत टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी उपस्थित होते.

बन म्हणाले की, गेल्या पंधरा-वीस वर्षापासून संजय राऊत सामनाचे संपादक म्हणवून घेतात. मराठी भाषेचा पुळका आपल्यालाच असल्याचा दावा ते सातत्याने करतात. लोकांना शब्दालंकार पुस्तके वाचण्याचे सल्ले देतात आणि आज मराठी भाषेची लिपी रोमन लिपी असल्याचा जावईशोध त्यांनी लावला. ‘देवनागरी’ ही मराठी भाषेची लिपी असल्याचे महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती आहे. रोमन आणि देवनागरी लिपी वेगवेगळी असल्याची साधी माहिती त्यांना नाही की जाणीवपूर्वक मराठीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे? असा सवाल उपस्थित करत कदाचित याचमुळे उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मुख्य संपादक करण्याऐवजी कार्यकारी संपादक ठेवणे पसंत केले, असा टोलाही बन यांनी लगावला.

महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे. प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे ही राज्य सरकार, महायुती आणि भाजपाची भूमिका आहे. परंतु मराठीच्या नावाखाली गुंडगिरी करणे, ती भाषा येत नसेल तर आम्ही तुमच्या कानाखाली मारू हे सहन केले जाणार नाही. भाषा हे संवादाचे माध्यम असले पाहिजे. ते विसंवादाचे किंवा हाणामारीचे माध्यम होता कामा नये अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट करत बन म्हणाले की येत्या महाराष्ट्र दिनापासून अशा पद्धतीचा कायदा यावा ज्यानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला मराठी शिकता आली पाहिजे. त्यासाठी निश्चितपणे एक मुदत दिली पाहिजे. महाराष्ट्रात मराठीचा स्वाभिमान जपला पाहिजे, मराठीची अस्मिता जपली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील आहे आणि सगळे परप्रांतीय बांधवही मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.

संजय राऊतांचे समर्थक आमदार उद्धव ठाकरेंना मतदान करणार नाहीत 

बन यावेळी म्हणाले, उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढण्याची शक्यता कमी असल्याची हर्षवर्धन सपकाळ यांना पूर्ण कल्पना आहे. उद्धव ठाकरे उभे राहिले तर उबाठा गटातील संजय राऊत यांच्या गटातील काही आमदार विरुद्ध मतदान करून उद्धव ठाकरेंचा पराभव करतील. त्यासाठी संजय राऊत यांनी पूर्ण मोर्चेबांधणी केली आहे. उद्धव ठाकरे उभे राहिले तर एक वेगळा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतो आणि त्या बाहेरच्या उमेदवाराला मदत करायची असे संजय राऊत यांच्या गटाच्या आमदारांचे धोरण असल्याने चारपाच मते इकडेतिकडे झाली तरी उद्धव ठाकरेंचा पराभव होऊ शकतो हे संजय राऊतना ठाऊक असल्याने ते कारस्थान रचत आहेत.

मुंबईतील इंग्रजांच्या गुलामीच्या खुणा पुसल्या गेल्या पाहिजेत, यासाठी के.ई.एम. रुग्णालयाचे ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य’ असे नामांतर करण्याची मागणी मंगल प्रभात लोढा यांनी केली. संजय राऊत, एकलव्याचे नाव द्यायला तुमचा नेमका विरोध का? किशोरी पेडणेकर तसेच उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक यांनी तिथे जाऊन आंदोलन केले. संजय राऊत, याच रुग्णालयाचे नाव जर ‘बाबर रुग्णालय’ किंवा ‘औरंगजेब रुग्णालय’ केले असते तर तुम्ही समर्थन केले असते का?, असा सवाल बन यांनी केला.

Popular Articles