– तांत्रिक कामगारांच्या हक्कांसाठी संघटना अधिक बळकट होणार
नागपूर :- तांत्रिक कामगार युनियन प्रणित तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या कार्यकारिणीत राज्याध्यक्षपदी प्रभाकर लहाने (वाशिम) यांची निवड करण्यात आली आहे. राज्य कार्याध्यक्षपदी विक्की कावळे (नागपूर) यांची नियुक्ती करण्यात आली असून, सरचिटणीसपदी प्रदीप पाटील (जळगाव) यांची निवड झाली आहे.
तसेच राज्य उपाध्यक्ष म्हणून नितिन भैय्या चव्हाण (सोलापूर), राहिल शेख (वाशिम) आणि धिरज घायवट (अमरावती) यांची निवड करण्यात आली आहे. उप सरचिटणीसपदी अतुल पाटील (वाशिम) व दत्तात्रय रायकर (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य सचिव म्हणून विक्रम वाघचौरे (अहमदनगर) व अजित दजगुडे (पुणे) व राज्य संघटक प्रताप खंदारे (सोलापूर) यांची निवड झाली असून, कोषाध्यक्षपदी राम पाटील (वाशिम) यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून तांत्रिक ॲप्रेंटिस व कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच राज्यातील कामगारांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

