– संपूर्ण जिल्ह्यातील आवागमन करणारे वाहनधारक त्रस्त, दोन वजनदार मंत्र्यांच्या तालुका असलेला निमखेडा फाटकावरील अंडर ब्रिज व ओवर ब्रिज चे हिवाळ्यापासून प्रलंबित असलेले काम पावसाळ्यात सुरू करणार काय? त्रस्त वाहन धारकाच्या गेंड्याची कातडी पांघरून कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला सवाल
किशोर साहु:मौदा :- गुरुवार (ता. 23 एप्रिल) ला निमखेडा फाटक दिवसा 11 वाजून 27 मिनिटांनी पाडण्यात आला, त्यानंतर तब्बल 15 मिनिटानंतर नागपूरकडून गोंदिया कडे जाणारी ट्रेन फाटकावरून निघाल्यानंतर 11 वाजून 42 मिनिटानंतर फाटक काढण्यात आले, असे फाटकावर उपस्थित नागपूर येथील दुचाकीधारक सम्यक शेंडे यांनी रेल्वे प्रशासनाच्या या कारभारावर आगपाखड करत सांगितले. ट्रेन येण्याच्या तीन मिनिटांपूर्वी फाटक पाडल्या जात असल्याचे सालवा येथील गेटमॅनने विचारपूस केल्यानंतर सांगितले होते. त्यामुळे फाटक उघडल्यानंतर लगेच निमखेडा फाटकावरील गेट मॅन दिलीप राऊत यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की निमखेडा रेल्वे स्थानकावर उभी असलेली नागपूरकडे जाणारी ट्रेनच्या इंजन या दरम्यान फेल झाल्यामुळे ती सुरू होऊ न शकल्याने, पंधरा मिनिटात दरम्यान एकच ट्रेन वाहनधारकांना आवागमन करताना दिसली. याबाबत आपण निमखेडा रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर पियूष यांना सविस्तर विचारा असे त्यांनी सांगितले. गेटमेन राऊत यांना पियुष यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक मागितला असता त्यांनी तो देण्यास नकार दिला व आपण स्वतः जाऊन निमखेडा रेल्वे स्थानकावर याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी भेटा असे राऊत यांनी सांगितले.
दीड महिन्यापूर्वी सुद्धा असाच प्रकार निमखेडा फाटकावर सकाळी नऊ वाजता दरम्यान घडला होता, तीस मिनिटे सतत पाच ते सहा ट्रेनच्या आवागमन झाल्यानंतर पंधरा मिनिटे पुन्हा इंजिन बदलण्यासाठी गेट बंद ठेवण्यात आला होता व तब्बल 45 मिनिटानंतर तो उघडण्यात आला होता. याबाबत सर्वच मराठी व हिंदी दैनिकाने बातम्याही प्रकाशित केल्या होत्या. बातम्यांमध्ये रेल्वे फाटकाच्या समस्येपासून वाहनधारकांना मुक्त करण्यासाठी या फाटकाजवळ सुरू असलेल्या अंडर बीज व ओवरबीज च्या प्रलंबित कामासंबंधातही उल्लेख करण्यात आला होता. मात्र हिवाळ्यापासून प्रलंबित असलेल्या अंडर बीज व ओवरबीजचे काम तालुक्यात दोन वजनदार मंत्री असतानाही उन्हाळ्यात सुरु न झाल्याने ते पावसाळ्यात सुरू होणार का? असा त्रस्त सवाल निमखेडा फाटकावर नियमित आवागमन करणाऱ्या वाहनधारकांनी गेंड्याची कातडी पांघरून कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनासमोर मांडलेला आहे.

