Wednesday, April 29, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ऑटोगँस समस्याचे जिल्हाधिकारी याना निवेदन

कन्हान :- ऑटोरिक्षा चालक मालक संघटना कृती समिती व्दारे मा. कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी नागपुर याना निवेदन देऊन ऑटोगँस एलपीजी ऑटो गँस पुरवठा नियमित करून पूर्ववत दर कायम करावे अशी मागणी करण्यात आली.

ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस विलास भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा समितीचे विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष  नरेंद्र वाघमारे यांच्या नियोजनातुन नागपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना एलपीजी ऑटोगँस समस्या बाबतचे निवेदन देण्यात आले. यात सातत्याने एलपीजी ऑटोगॅस ची दरवाढ, त्यावरही पुरवठा खंडित असल्याने जवळपास सर्वच गॅस पंप बंद पडले आहेत. गॅस पुरवठा नियमित करून पूर्ववत दर कायम करावे, या आशेचा निवेदन देते वेळी टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे महासचिव प्रकाश साखरे, कोषाध्यक्ष अशोक न्यायखोर, अब्दुल आसिफ, आनंद मानकर सोबतच कामठी, कन्हान वरून बाळु नागदेवे, नरेंद्र पात्रे, रिजवान हैदर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.