spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी तालुक्यात पाणी टंचाईवर आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज

 – टंचाईग्रस्त गावांची संयुक्त पाहणी

– पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांची संयुक्त पाहणी

कामठी :- उन्हाळा सन 2025-26 अनुषंगाने कामठी तालुक्यात पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत टंचाईग्रस्त ग्रामपंचायत भामेवाडा व ग्रामपंचायत गारला (सावळी) येथे संयुक्त पाहणी करण्यात आली.

या पाहणीत मा. तहसीलदार जगदाळे , गट विकास अधिकारी बाळासाहेब यावले, तसेच कनिष्ठ अभियंता (ग्रा.पं. पू.) सुशांत कन्नाके यांनी सहभाग घेतला. संबंधित गावांचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी देखील उपस्थित होते.

उन्हाळ्याच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक टंचाई प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जलजीवन मिशन व पाणी टंचाई अंतर्गत सुरू असलेल्या नळयोजनांची विशेष दुरुस्ती, स्रोत बळकटीकरण इत्यादी कामांबाबत आवश्यक कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.

सदर पाहणीदरम्यान भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

Popular Articles