spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मराठा सेवा संघ कन्हान व्दारे भोंदु बागेश्वरचा तिव्र निषेध व महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी 

– महामहिम राष्ट्रपती यांना कन्हान थानेदार मार्फत निवेदन देऊन मागणी

कन्हान :- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजां विषयी अत्यंत बेताल पुराव्यारहित खोटे अपमान जन क वक्तव्य केल्याने मराठा सेवा संघ कन्हान, जिजाऊ ब्रिगेड, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, कन्हान शहर विकास मंच आदी संघटना व्दारे शिवाजी महाराज पुतळा सामोर भोंदु बागेश्वर चा तिव्र निषेध करून महाम हिम राष्ट्रपती यांना कन्हान थानेदार वैजयंती मंडवधरे यांचे मार्फत निवेदन देऊन भोंदु बागेश्वर याचे वर कठोर कारवाई करून महाराष्ट्रात येणास बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

बुधवार (दि.२९) एप्रिल २०२६ सकाळी ११ वाजता शिवाजी नगर कन्हान येथिल महाराजांच्या पुतळया समोर मराठा सेवा संघ कन्हान, जिजाऊ ब्रिगेड, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, कन्हान शहर विकास मंच आदी संघटना व्दारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी खोटया इतिहासाचे वकत्व करून महाराजांचा अवमान करणा-या बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री याचा तिव्र निषेध घोषणा देऊन करण्यात आला.

शुक्रवार (दि.२४) एप्रिल ला नागपुर येथे भारत दुर्गा मंदीर भूमीपूजना प्रसंगी बागेश्वर धामचे धिरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यानी रयतेचे राजे,महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अत्यंत बेताल पुराव्यारहित खोटे अपमान जन क वक्तव्य करून अवमान केल्याने संतापाची लाट उसळुन संपुर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमीच्या भावना दुखाव ल्याने धिरेंद्र शास्त्री चा तिव्र निषेध करण्यात आला. तसेच हिंदुनी ४ अपत्य करून एक आरएसएस ला एक अपत्य दान करावे असे लोकशाही विरोधी वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात जादुटोना विरोधी कायदा २०१३ अस्तिवात असताना भोंदु धिरेंद्र बुवा दिव्य दरबार भरवुन अंधश्रध्दा पसरवित असतो. बागेश्वर धामचे भोंदु धिरेंद्र शास्त्री हे महाराष्ट्रात नेहमी कार्यक्रमाला येऊन येथिल महान संत, महापुरूषांच्या विषयी अपमा नजनक वक्तव्य करून येथे सामाजिक तेढ निर्माण करून महाराष्ट्राचे वातावरण दुषित करित असल्याने शिवप्रेमी साध्या माफीवर शांत न बसता भोंदु बिरेंद्र शास्त्री यांचेवर कठोर कारवाई करून त्याला महाराष्ट्रा त येण्यास बंदी घालण्यात यावी. अशी मागणी मराठा सेवा संघ कन्हान चे ताराचंद निंबाळकर, शांताराम जळते, मोतीराम रहाटे, प्रशांत भोयर, वसंतराव इंगोले, योगराज अवसरे, प्रशांत मसार, कमलसिंह यादव, विनायक सहारे, राधेश्याम भोंगाडे, रविंद्र कोचे, प्रफुल वैद्य, जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्ष माया इंगोले, लता जळते, प्रिती कुकडे, गीता साळवे, अंधश्रध्दा निर्मुलन समिती चे विशाखा ठमके, ज्ञानप्रकाश यादव, जयराम तिडके, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष ऋृषभ बावनकर, भरत साळवे, मुलचंद शिंदेकर, रविंद्र दुपारे आदीनी महामहिम राष्ट्रपती यांना कन्हान थानेदार वैजयंती मंडवधरे यांचे मार्फत निवेदन देऊन केली आहे.

Popular Articles