spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्य कार्याध्यक्षपदी विक्की कावळे यांची बिनविरोध पुन्हा निवड

नागपूर :- तांत्रिक कामगार युनियन प्रणीत तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या राज्य कार्याध्यक्षपदी विक्की कावळे यांची बिनविरोध पुनर्निवड करण्यात आली आहे. राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांच्या हस्ते कावळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, सरचिटणीस प्रदिप पाटील, राज्य उपाध्यक्ष नितिन भैय्या चव्हाण, राहिल शेख, धिरज घायवट, उप सरचिटणीस अतुल पाटील व दत्तात्रय रायकर, राज्य सचिव विक्रम वाघचौरे व अजित दजगुडे, राज्य संघटक प्रताप खंदारे तसेच कोषाध्यक्ष राम पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कावळे यांचे अभिनंदन करून संघटनेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात आणि उच्च स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular Articles