spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान मध्ये “गौ सम्मान आव्हान मोहिम” राबविले

– तहसिलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधानांना विविध मागणीचे प्रार्थना पत्र पाठविले

कन्हान :- शहर आणि ग्रामीण भागात “गौ सम्मान आव्हान मोहिम” राबविण्यात आले. या मोहिमे अंतर्गत , पारशिवनी तहसीलचे तहसिलदार सुरेश वाघचौरे यांच्या मार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना विविध मागणीचे प्रार्थना पत्र पाठविण्यात आले. यात देशात गौ हत्या बंदी, गाईला राष्ट्रमाता म्हणुन घोषित करणे, गोसंरक्षणासाठी केंद्रीय कायदा करणे आणि गो सेवे साठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“गौ सम्मान आव्हान” मोहीम देशभरातील संत आणि गो भक्तांनी आयोजित केली होती. गाईला “राष्ट्र माता” दर्जा देणे, देशात गौ हत्या बंदी झाली पाहिजे, केंद्रीय कायदा करणे, गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रात मंत्रालय स्थापन करणे आणि जनावरांना योग्य संरक्षण सुनिश्चित करणे यांसाठी केंद्र सरकारला जागरूक करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या मोहिमेचा प्रभाव परशिवनी तहसिल मध्ये ही दिसुन आला.

प्रशु प्रेमी शुभम बावनकर, आयुष संतापे, निखिलेश चकोले, गौरव तिवारी आणि इतर तरुणांनी कन्हान, कांद्री, टेकाडी, खदान, वराडा, खेडी, गहुहीवरा आणि निलज या सह आसपासच्या ग्रामीण भागांमध्ये ‘ गौमाता सम्मान अभिमान ‘ मोहीम राबविण्यात आली. स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली आणि मोहिमेबद्दल पत्रके वाटुन लोकांना माहिती देण्यात आली. हजारो लोकांनी या मोहिमेत सामील झाले आणि त्यांनी स्वाक्षरी केली . गोशाळांना पाठिंबा देणे, गायींचे संरक्षण करणे आणि समाजात गोमातेबद्दल आदर व जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता. नियोजनानुसार, सोमवार (दि.२७) एप्रिल २०२६ रोजी देशभरात तहसि ल आणि जिल्हा स्तरावर एक मोठे निवेदन सादर करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कन्हान मध्ये पशुप्रेमी आणि गौ भक्तांनी सोमवार (दि. २७) एप्रिल ला शिव पंचायत हनुमान मंदिरात गौ माते ची विधीवत पूजा अर्चना केली. यानंतर पारशिवनी तहसिलचे तहसिलदार सुरेश वाघचौरे यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती एस. द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रार्थना पत्र पाठवुन देशात गौ हत्येवर पूर्ण बंदी घालावी, गाईला राष्ट्रमाता म्हणुन घोषित करावे, गो सेवेसाठी केंद्रीय कायदा करावा आणि स्वतंत्र गोसेवा केंद्रात मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी रंजना किरपाने, अर्चना तांडेकर, मीना गिऱ्हे, मीना कळंबे, शुभम बावनकर, आयुष संतापे, निखिले श चकोले, विनोद यादव, ऋषभ बावनकर, राजेश देशमुख, मुकुंदा नैरकर, चक्रधर खेरगडे, विष्णु वाढई, गौरव तिवारी, बंडुजी गजभिये, सुभाष बोरीकर, राहुल रेवतकर, अरुण वाघमारे, प्रविण पवार, बंटी गजभिये, कमलाकर बंड सह आदि नागरिक उपस्थित होते.

Popular Articles