spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हानमध्ये बुद्ध जयंती निमित्त भव्य धम्म रॅली व विविध कार्यक्रम

– रिपब्लिकन सांस्कृतिक संघ व चंद्रशेखर भिमटे मित्र परिवारातर्फे आयोजित

कन्हान :- विश्वशांतीचे अग्रदूत, महामानव, महाकारु णिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान यांच्या तत्वावधानत व चंद्रशेखर भिमटे मित्र परिवाराच्या वतीने कन्हान शहरात भव्य धम्म रॅली आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार (दि.३०) एप्रिलला रात्री १२ वाजता कन्हान शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रात्री ठीक १२ वाजता बुद्ध जयंती निमित्त विशाल केक कापूुन व फटाकाचे आतिशबाजी करून उत्साहात जल्लोष साजरा करण्यात येईल. यावेळी उपस्थित भदंत आर्य के.सी.एस.लामा महाथेरो व उपासक-उपासिकांकडुन सामुहिक बुद्ध वंदना घेतली जाईल. बुद्ध जयंतीच्या मुख्य दिवशी शुक्रवार (दि.१) मे ला सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेड कर यांच्या प्रतिमांना भव्य माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. तसेच सायंकाळी ६ वाजता पंचशील नगर सत्रापुर येथील महाविहारामध्ये बुद्ध वंदना व पंचशील ग्रहण करून भव्य धम्म रॅलीला सुरुवात होई ल. ही रॅली महामार्ग क्रमांक ४४ वरील बी.के.सी.पी. स्कुल, गांधी चौक, पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तारसा चौक, राय नगर या मार्गे भ्रमण करित नाका नंबर ७ येथील सुजाता बुद्ध विहार येथे रॅलीचा समापन होईल. या निमित्ताने सर्व भाविकांसाठी भव्य भोजनदानाचे आयो जन करण्यात आले आहे. समतेचा हा प्रवाह अखंड प्रवाहित ठेवण्यासाठी कन्हान व परिसरातील जनतेने हजारोंच्या संख्येने धम्म रॅलीत आणि कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक रिपब्लिकन सांस्कृतिक संघ व चंद्रशेखर भिमटे मित्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles