Friday, May 1, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वाधार’ योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 5 मेपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 5 मेपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच जे विद्यार्थी कागदपत्राची पुर्तता करणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात सदर विद्यार्थ्यांस अर्ज करता येणार नाही व तो स्वाधार योजनेपासुन वंचित राहील. असे आयुक्तालय समाज कल्याण पुणे यांनी कळविले आहे.

तेव्हा स्वाधार योजने करीता विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन सर्व कागदपत्रासह अपलोड करुन 5 मे पर्यंत प्रस्तुत कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु हार्डकॉपी अद्याप कार्यालयात सादर केलेले नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीत अर्ज सादर न केल्यास व सदर योजनेपासुन विद्यार्थी वंचित राहिल्यास सदर बाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील. तसेच निर्धारीत मुदतीत त्रुटी पुर्तता न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरणार कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगला मुन, यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.