Friday, May 1, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

गडचिरोली :- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील दारीद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन 100 टक्के अनूदानावर उपलब्ध करून द्यावयाची आहे. सदर जमीन शासनाने लाभार्थ्यांना खरेदी करून द्यावयाची आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे त्यांनी विकत असलेल्या जमीनीचा 7/12, जमिनीचा नकाशा, धारण करीत असलेल्या जमीनीचा तपशील (नमुना 8-अ), जमीन मोजणी “क” प्रत, गाव नकाशा, रु. 100 च्या स्टँम्पपेपरवर शपथपत्र इत्यादी माहितीसह जमीन विक्रीबाबतचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा. तसेच शासन निर्णय दिनांक 14 ऑगस्ट 2018 नूसार जमीन खरेदीबाबतची कार्यवाही करण्यात येईल. अधिकच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली डॉ. सचिन मडावी यांनी कळविले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.