spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने “या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे” अश्या अनेक स्फूर्ती गीताच्या माध्यमातून देशाला एकात्मतेच्या सुत्रात बांधणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

नागपूर महानगरपालिकातर्फे उपमहापौर लिला हाथीबेड यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक येथे गुरुवारी सकाळी (ता.30) महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच मनपा मुख्यालयातील महापौर दालनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मनपा उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त राजेश भगत यांनी पुष्प अर्पण करून वंदन केले. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, जनसपंर्क विभागाचे अमोल तपासे, प्रमोद बारई, रविंद्र किंदर्ले, संजय मेंढुले, जामनकर, प्रविण वानखेडे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles