– उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली नामकरण समितीची बैठक संपन्न
नागपूर :- नागपूर शहरातील विविध महत्त्वाचे चौक आणि रस्त्यांना नामकरण करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आज(ता.३०) ‘नामकरण समिती’ची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागपूरच्या उपमहापौर तथा समिती अध्यक्षा लिला अजय हाथीबेड होत्या. शहरातील विविध भागांतील नामकरणाचे प्रस्ताव तातडीने संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर जलद कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकी दिलीप वामनराव दिवे, विद्या राजेश कन्हेरे, रामदास द्वारकाप्रसाद शाहू, चंद्रकांत मनोहर खंगार, दीपक मोहन पटेल, आसिफ शादीक शेख (गुड्डू) प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीमध्ये नामकरणाचे प्रस्ताव नेमक्या कोणत्या प्रशासकीय कार्यपद्धतीने हाताळले जातात, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या प्रकल्प-१ विभागाच्या कार्यकारी अभियंता अल्पना पाटने यांनी या प्रक्रियेची तांत्रिक आणि प्रशासकीय माहिती समिती सदस्यांना दिली. नामकरणासाठी येणारे अर्ज, त्यांची छाननी आणि अंतिम मंजुरीपर्यंतची प्रक्रिया कशी असते, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, समिती सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना आणि शंकांना कार्यकारी अभियंत्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

