spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अट्टल चोरटा जुनी कामठी पोलिसांच्या जाळ्यात

भंडारा जिल्ह्यातील अनेक चोरीप्रकरणांतील आरोपीला अटक

कामठी २४ : भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीप्रकरणी फरार असलेल्या अट्टल चोरट्याला अखेर जुनी कामठी पोलिसांनी त्यांच्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून मंगळवारी सायंकाळी लखन ईश्वर दयाल बोरे (वय ४५, रा. लोभी, ता. तुमसर, जि. भंडारा) या आरोपीला अटक करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, २२ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास लखन बोरे हा अंधारात कामठी कृउबा परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, मोठ्या नियोजनबद्ध पद्धतीने त्याला ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर प्राथमिक चौकशीत लखनने भंडारा जिल्ह्यातील गोबरवाई, वरठी आणि तुमसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली.

आरोपीविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल असून, त्याला पुढील कारवाईसाठी गोबरवाई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई जुनी कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर भंडारी, गणेश बोराटे, श्रीकांत विष्णूकर, रमेश बंजारा, विवेक दोषेटवार आणि शारीक खान यांच्या पथकाने केली. या कामगिरीमुळे जुनी कामठी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Popular Articles