spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राजधानी दिल्लीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’चा जयघोष

– महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

नवी दिल्ली :- महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र परिचय केंद्र आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा आणि कला-संस्कृतीचे दर्शन राजधानीत घडवले.

या सोहळ्यास राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, नितीन खाडे (भा.प्र.से.), धनंजय घनवट (भा.पो.से.), सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे आणि सदन व्यवस्थापक प्रमोद कोलपाते यांसह प्रशासकीय सेवेतील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय भारावलेल्या वातावरणात महाराष्ट्र राज्यगीत “जय जय महाराष्ट्र माझा”याच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर मुंबईतील अमेय पाटील डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी रंगमंचावर महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शन घडवले. यामध्ये गणेश वंदना, कोळी नृत्य, नखरेल लावणी, वासुदेव आणि इतर पारंपरिक लोकनृत्यांच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.