spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तांत्रिक कामगार यूनियनचे कार्य समाज कल्याणाचे – ना. प्रकाश आबिटकर

नागपूर :- महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून तांत्रिक कामगार युनियन च्यावतीने सामाजिक, प्रेरणादायी व लोकोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने तांत्रिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबीटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात “ऊर्जा भरारी -नवी दिशा, नवा विचार” या तांत्रिक कामगार युनियनच्या अधिकृत मुखपत्राच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन आरोग्य मंत्री व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

या मुखपत्राच्या माध्यमातून संघटनेची भूमिका, कामगारांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम, प्रेरणादायी विचार व संघटनात्मक दिशा राज्यभर पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे साहेब उपस्थित होते. तसेच कार्यक्रमात युनियनचे कार्याध्यक्ष शिवाजी शिवनेचारी, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपाध्यक्ष बी आर पवार, सतीश भुजबळ, उपसरचिटणीस आनंद जगताप. रघुनाथ तात्या लाड, विलास डवर, विलास निमसटकर, अनिल सरोदे, विवेक बोरकर, युवा तांत्रिक कामगार संसदचे प्रमुख देवेंद्र साळुंखे, तांत्रिक अप्रेंटिस कामगार असोसिएशनचे कार्याध्यक्ष विक्की कावळे, निलेश चक्रपाणी, मंगेश चिमोटे, रितीक वानखडे तसेच बहुसंख्य पदाधिकारी व तांत्रिक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नामदार प्रकाश आबीटकर यांनी तांत्रिक कामगार युनियनच्या कार्याचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. ही संघटना केवळ कामगारांच्या हक्कांसाठीच नव्हे, तर समाज कल्याणासाठीही सातत्याने कार्यरत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करताना त्यांनी विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात तांत्रिक कामगारांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय अडचणीमध्ये तांत्रिक अन्न छत्रालय जेवणाची व्यवस्था करून केलेल्या मदतकार्याची प्रशंसा केली. संकटकाळात संघटनेने उचललेले हे पाऊल अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व ऐतिहासिक वातावरणात पार पडला. उपस्थित सर्व मान्यवरांनी तांत्रिक कामगार युनियनच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक यूनियनचे सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी तर संचालन विश्वास आरडे यांनी तर आभार विलास डवर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तांत्रिक कामगार उपस्थित होते.

Popular Articles