नागपूर :- शहरातील शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमधील विविध समस्यांबाबत शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष, पूर्व विदर्भ तर्फे केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील प्रमुख मुद्दे:-एम्स रुग्णालय जामठा, जीएमसी रुग्णालय मेडिकल चौक, इंदिरा गांधी मेवा रुग्णालय बजरिया, मच्छी बाजार समोरील धर्मदाय आयुक्त रुग्णालय येथे रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधी योजनांमध्ये गोरगरीब रुग्णांची फसवणूक व आर्थिक लूट होत असल्याची तक्रार.-ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना शहरातील रुग्णालयांमध्ये वेळेवर व उत्तम उपचार मिळत नसल्याने होणारा त्रास. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुकुंद शर्मा व यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रत्येक रुग्णालयात दर्जेदार उपचार मिळावेत आणि शासकीय योजनांचा लाभ थेट गरजूंपर्यंत पोहोचावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी उपस्थित मान्यवर महिला आघाडी विदर्भ प्रमुख नेहा अंबादे, नागपूर शहर जिल्हा प्रमुख सचिन शर्मा, जिल्हा समन्वयक सुनील हाथीथेले, महिला आघाडी संपर्क प्रमुख शिल्पा रामेलवार, शहर संपर्क प्रमुख रमेश डोके, शहर प्रमुख जगदीश गुप्ता, वैद्यकीय सलागार प्रमुख डॉ. वलिऊन रहमान डॉ. जयप्रकाश भर्गव चंद्रपूर जिल्हा प्रमुख अँड. अजय वांढरे, वर्धा संपर्क प्रमुख विनोद बाभुळकर, द.प. नागपूर विधानसभा संघटक संजय गवई, मध्य नागपूर विधानसभा संघटक निशांत वासानी तसेच इतर पदाधिकारी व आरोग्यदूत मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोरगरीब व ग्रामीण भागातील रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे निवेदन









