नागपूर :- दक्षिण नागपूर शिवसेने तर्फे शुक्रवारी १ मे २०२६ रोजी, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उदयनगर चौकात पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला असून दक्षिण नागपूरातील शिव सैनिकां तर्फे सुरज गोजे यांची नगरसेवक व डीपीडीसीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल, दक्षिण नागपूर शिवसेना पदाधिकारी तर्फे सत्कार करण्यात आला. तसेच पक्षासाठी सतत कार्य करणाऱ्या व नेहमीच आपला अमूल्य वेळ देणाऱ्या महिला पदाधिकारी शिवसैनिकांचा पदाधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हाप्रमुख सुरज गोजे, विशाल कोरके, गणेश चारलेवार, राजा रामद्वार, नीलिमा शास्त्री, धम्मा सोनटक्के, राकेश भोंदले, अतुल डहाके, यांच्यातर्फे करण्यात आला. तसेच रिक्षाचालक आटोचालक व स्थानिक दुकानदार लोकांचा स्वागत सत्कार सन्मानचिन्ह दुपट्टे, अल्पोआहार देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात प्रामुख्याने उज्वला उमरे, नलिनी सदावरती, अनिता डोमळे, रूपाली लाखे, सोनाली उमरे, रुपेश ठाकरे, किरण शेडके, निरंजन नाकाडे, विनोद चकोर, अतुल डहाके, पंकज ढोबळे, पवन वाघमार, शैलेश काशिकर, नितीन सहारे, हेमंत बगवे, प्रशांत धावंडे, सुरेंद्र आंबीलकर, शैलेंद्र आंबीलकर, अखिलेश भुगावकर, हेमंत बगवे, विशाल मानकर, जय वाडेकर, शुभम वाडेकर, शुभम करमरकर, शंकर बेलखोडे आदी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला व मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला.








