spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

थेलेसेमियामुक्त अभियान अंतर्गत सामूहिक शपथ

-थेलेसेमियामुक्त अभियान सप्ताहाचे 1 ते 8 मे दरम्यान आयोजन

कामठी :- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे ‘एक पाऊल थेलेसेमियामुक्तीकडे’या अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त आणि जागतिक थेलेसेमिया दिनाचे 8 मे चे औचित्य साधून कामठी येथे शासकीय उपजिल्हा रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 1 ते 8 मे या कालावधीत थेलेसेमियामुक्त अभियान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार काल 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डे-वन अ‍ॅक्टिव्हिटी पार पडली. वैद्यकिय अधिक्षिका डॉ. निशात शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. शबनम खानूनी यांच्या मुख्य उपस्थितीत . एकूण १०७ कर्मचाऱ्यांनीथेलेसेमीयामुक्त ची सामूहिक शपथ घेतली.

याप्रसंगी वैद्यकिय अधिक्षिका डॉ निशात शेख व डॉ शबनम खाणुनी यांनी सांगितले की थेलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्ताचा विकार आहे यात शरीरातील हिमोग्लोबिन तयार करण्याच्या प्रक्रियेत दोष निर्माण होतो .विशेषतः हा आजार पालकांकडून मुलांकडे जातो ,शरीरात लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी होते. रुग्णाला जगवण्या वारंवार रक्त चढवावे लागते तेव्हा या थेलेसेमिया प्रतिबंधाला अधिक गती देण्याचा संकल्प करीत एक पाऊल थेलेसेमियामुक्तीकडे या अभियानाच्या वर्षापूर्तीनिमित्त कामठी तालुक्यात 1 मे पासून 8 मे पर्यंत थेलेसेमियामुक्त अभियान सप्ताह राबविन्यात येत आहे या अभियानाची सुरुवात 1 मे ला सामूहिक शपथ घेऊन करण्यात आली असून महाविद्यालयात व्याख्याने घेऊन मार्गदर्शन करणे, गर्भवती महिला व कुटुंब सल्ला, क्लिनिक मध्ये गर्भवती मातांचे समुपदेशन आणि हाय रिस्क जोडप्याची यादी तयार केली जाईल. रुग्ण साहाय्य व रक्तदान , तपासणी दिवस,18 ते 35 वयोगटातील व्यक्ती आणि लग्न ठरलेल्या जोडप्यांची एचपीएलसी व सीबीसी तपासणी केली जाईल , जनजागृती रॅली व मीडिया दिवस व 8 मे ला जागतिक थेलेसेमिया दिन साजरा करीत आरोग्य मोहिमेचा आढावा घेण्यात येणार आहे.

तेव्हा कामठी तालुका थेलेसेमिया मुक्त करण्यासाठी आरोग्य साक्षर व्हा आणि थेलेसेमियाची माहिती घ्या,लग्नापूर्वी सीबीसी आणि एच बी इलेक्ट्रॉफोरेसिस चाचणी करा,दोन्ही जोडीदार कॅरीअर असल्यास तज्ञाचा सल्ला घ्या व पहिल्या तिमाहीतील सर्व नोंदणीकृत गर्भवती मातांची एचपीएलसीतपासणी अनिवार्यपणे केले जाईल,सर्व थेलेसेमियाग्रस्त बालकाची संख्या निश्चित करून त्यांची नोंदनी केली जाईल.

थेलेसेमियामुक्त तालुका घडविण्यासाठी नागरिकांनी विशेषतः तरुण जोडप्यानी व गर्भवती मातांनी या सप्ताहात आयोजित तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा व येणाऱ्या पिढीला थेलेसेमियामुक्त जीवनाची भेट द्या असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोटे, डॉ निशात शेख व डॉ शबनम खाणुनी यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.