spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नप राजेंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, वाणिज्य शाखेत ८५.७१ टक्के तर कलेत ९२.८५ टक्के निकाल

खापा, वार्ताहर :- नुकताच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत खापा शहरातील नगर परिषद द्वारा संचलित राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून एकून ३५ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते, त्यातून एकूण ३१ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे.

राजेंद्र हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमधून कला शाखेतून प्रथम पायल भानुदास कोहाळ ५५.३३ टक्के, द्वितीय प्रशिक राजू डोंगरे ५३.५० टक्के, तृतीय शिरेश दशरथ भलावी ४९.३३ टक्के तर वाणिज्य शाखेतून प्रथम श्लोक सुभाष धकाते ६३.५० टक्के, सिद्धेश देवेंद्र पवार ५२ टक्के, हर्षिका दुर्वास धांदे ५१.५० टक्के गुण घेत शाळेचा एकंदरीत ८८.५७ टक्के निकाल लागला.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे न. प. खापा मुख्याधिकारी सचिन राऊत, नगराध्यक्ष पियूष बुरडे, शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे, शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नेहारे, पर्यवेक्षक शामराव खडसे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक दिलीप मिरचे, युवराज तायवाडे, रुपेश कोहळे, शिक्षिका सोनाली तुमाने, मिताली आवते, लता राऊत यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती, पालक समिती, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर मेहनत घेतली असून विद्यार्थ्यांनी अभ्यास करीत यश मिळविले, असल्याची प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नेहारे यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.