– वानिज्य शाखेत ९३.८३ % गुण घेवून मिळविले घवघवीत यश
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- अभ्यासाचे योग्य नियोजन केलं तर चांगले गुण मिळवता येतात. याचा प्रत्यय खुशी चेतन धुवाविया ईच्या बारावीच्या परीक्षेतील यशाकडे पाहून येतो. तालुक्यातील जनप्रभा इंटरनॅशनल शाळेची एचएससी बोर्डाची १२ वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी खुशी चेतन धुवाविया हिने या बोर्डाच्या १२ वी परीक्षेत ६०० पैकी ५६३ म्हणजे ९३.८३ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तीच्या यशामुळं कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. “आमच्या घरात कोणीही इतके गुण मिळवले नाही. तिने आता आणखी पुढं जावं,” असं भावनिक मत वडिलांनी इनसाइडर न्यूज टुडेशी बोलतांना व्यक्त केलं. खुशी ने फक्त एका विषयात ९० तर इतर विषयात नव्वद पेक्षा वर गुण प्राप्त करून हे यश संपादन केलेले आहे.