पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी येथील निवडणुकांमध्ये मिळालेला हा ऐतिहासिक विजय म्हणजे जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या धोरणांवर ठेवलेला दृढ विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
दीर्घकाळ भीती, हिंसा आणि अस्थिरतेच्या छायेत राहिलेल्या राज्यांमध्ये आता परिवर्तनाची नवी पहाट उगवली असून, हा विजय सामान्य नागरिकांच्या सुरक्षित, स्थिर आणि प्रगत भविष्याच्या अपेक्षांचा विजय आहे. केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे समाजातील सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचला असून, त्याचाच हा सकारात्मक परिणाम आहे.
आगामी काळात या जनादेशाचा सन्मान राखत अधिक वेगाने विकासकामे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
– आ. संदीप जोशी
विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य