किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच शाळा पूर्व तयारी मेळावा हे दोन्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश निरगुळकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील प्रशांत वाडीभस्मे, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे ,कृषी रुपाली गिर्हेपुंजे , दिनेश बावणे, नितीन बावणे, सचिन बावणे, अर्जुन न्यायखोर, शाळा स्वयंपाकी शोभा बावणे , अंगणवाडी सेविका ज्योति वाडीभस्मे गावातील मान्यवर व विद्यार्थीवृंद उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच विद्यार्थी विकासाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि पालक आणि विद्यार्थी यांचा सहभाग घेऊन विविध शैक्षणिक खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका पठाण तब्बसून यांनी केली. त्यांनी विद्यार्थ्यांना या विशेष दिवसांचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापिका यांनी केले, तर आभार प्रदर्शन सेजल बावणे (अंगणवाडी मदतनीस) यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.