spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गळफासाने आत्महत्या पर्यंत संदीप नागोसे चा उपचारा दरम्यान मुत्यु

कन्हान :- गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मेयो रुग्णालय नागपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मृतक संदीप अरविंद नागोसे वय ४२ वर्ष रा. कळंब वार्ड क्र.१ जिल्हा यवतमाळ हा फोर व्हिलर चालक असुन रवी राऊत यांचे सोबत घराचे सामान मध्यप्रदेश राज्यात सोडण्याकरिता भाड्याने गाडीवर गेला व बुधवार (दि.२९) एप्रिल ला सकाळी ५ वाजता दरम्यान परत येत असतांना संदीप कान्द्री कन्हान परिसरात गाडीतुन उतरुन वेळ्या सास्खा बोलुन वागुन शेतात पळुन गेला. रवी राऊत यांनी मृतकाची पत्नीला सांगितले. पत्नी त्यांचा शोध घेत असतांना पोलीसांनी सांगितले कि, अनोळखी वेळसर तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे उपचारा करिता नेले आहे.

फिर्यादी कविता संदीप नागोसे हिने जावुन पाहिले असता तेथील डाॅक्टरांनी पुढील उपचारा करिता मेयो रुग्णालय नागपुर येथे रेफर केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे उपचार कामी आनलेले लोकांना विचारपुस केली. तर त्यांनी सांगितले कि, मृतक संदीप हा वेडा सारखा वागत होता व रस्सी ने गळफांस तयार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करित असतांना त्यांस उपचार करिता प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे आणले. शनिवार (दि.२) मे ला मृतक हा उपचार घेत असतांना डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.

सदर प्रकरणी मृतकाची पत्नी च्या बयाना वरुन कन्हान पोलीसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.