किशोर साहू, मौदा :- महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रा पं कोदामेंढी तर्फे ध्वजारोहण केल्यानंतर जि प हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील मार्च 2025 मधील दहावी व बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या वर्गशिक्षकांचा शाल ,त्रिफळ, शिल्ड , रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मेघाश्री आनंद बावनकुळे (प्रथम, 86.60%), धनश्री किशोर बावनकुळे (द्वितीय,82.60) वर्गशिक्षक एम. एस .अहिर, एस .एस. गिरे, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये भूमि कोठीराम निनावे,( प्रथम 65.50% ),करिष्मा विनायक राऊत (द्वितीय, 64.50%), वर्गशिक्षक सी. व्ही .जाधव यांच्या समावेश आहे.
याप्रसंगी सरपंच आशिष बावनकुळे, उपसरपंच गोपाल गिरमेकर, ग्रामपंचायत सदस्यगण रवी ठवकर, विष्णू बावनकुळे, सदानंद मेश्राम, खुशाल शिवणकर, अनिता हटवार , स्वाती गौरखेडे, रूपाली ठाकरे, कोमल खडसे, अंजली मोहूर्ले, हेमलता देवतळे सह गावातील मान्यवर उपस्थित होते.