Home Latest News बँडबाजाच्या तालावर कामठीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

बँडबाजाच्या तालावर कामठीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

0
2

कामठी :- भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरात उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी चौक येथे बँडबाजाच्या तालावर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत फटाके फोडले व मिठाईचे वाटप केले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी झारमोरी वाटून जल्लोष अधिक रंगतदार केला.

कामठी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. प. बंगालमधील विजय हा त्यांच्या राष्ट्रवाद व हिंदुत्वाच्या विचारांचा परिणाम असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले. ३७० कलमासारख्या मुद्द्यांवर त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशाला दिशा मिळाल्याचेही सांगण्यात आले.

या प्रसंगी शहराध्यक्ष मंगेश यादव, महिला आघाडी अध्यक्ष नंदा बारई, नगरसेविका दिव्या गायधने, मनीषा नागपुरे, अंतरा वैद्य तसेच नगरसेवक लालसिंग यादव, दिलीप बांडेबूचे, विवेक मंगतानी, राजेश देशमुख, कपिल गायधने, राज हाडोंती, नरेश पारवानी, आशू अवस्थी, विजय कोंडुलवार, नितीन रावेकर, दिनेश बिल्लरवान, अल्पेश लांजेवार, राजेश खंडेलवाल,कमल यादव ,प्रीतम यादव, समीर यादव, बबलू रोचलानी, देवानंद देशमुख, कुंदन शर्मा, कुणाल सोलंकी, शानू ग्रावकर, रोहित तरारे,जितेंद्र खोब्रागडे ,यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.