नागपूर :- विभागीय लोकशाही दिनाचे सोमवार, 11 मे 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडे नागरिकांच्या प्रलंबित असलेल्या तक्रारींचा निपटारा व अनुषांगिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. लोकशाही दिनात अडचणी, गाऱ्हाणी व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासंह सकाळी 11 ते 12 या वेळेत उपस्थित राहण्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तुषार मठकर यांनी कळविले आहे.