नागपूर :- नागपूरातील एक समाजसेवक एक पत्रकार धनंजय तरारे यांनी गेल्या एक वर्षांपूर्वीपासून साप्ताहिक महाविचार हा न्युज पेपर अमलात आणण्यासाठी पूर्णपणे परिश्रम घेऊन यश मिळविले. समाजासाठी नवीन सोच नवीन आवाज घेऊन येणारा साप्ताहिक महाविचार हलचल – लोकल पेपरपासून तर नॅशनल पेपरपर्यंत मजबूत पाऊल उचलण्यासाठी धनंजय तरारे यांनी ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नशिल असून महाराष्ट्र दिनी, जरीपटका नारा बस स्टँड ग्राउंड वरील “साप्ताहिक महाविचार हलचल चे” उद्घाटन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. याप्रसंगी मंचावरील स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी व सत्तापक्षनेते बाल्या बोरकर तसेच नगरसेवक विकी कुकरेजा प्रभाग क्रं. १ जरीपटका येथील मंडळ अध्यक्ष संजय चौधरी, नगरसेविकां सुषमा चौधरी, प्रमिला मतराणी, आणि महेंद्र धनविजय यांची उपस्थिती मंचावर होती.
साप्ताहिक महाविचार हलचल चे केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या हस्ते विमोचन
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.