spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केंद्र सरकारने बाबू हरदास एल एन यांच्या नावाने टपाल तिकीट जाहीर करावी

कामठी :- “जयभीम” नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल.एन. यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने टपाल तिकीट जाहीर करावी. या मागणीला घेऊन बाबू हरदास एल. एन. मागासवर्गीय संस्था कामठी चे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांच्या नेतृत्वात रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना एका शिष्टमंडळाने भेट दिली व निवेदन दिले. याप्रसंगी खासदार श्याम कुमार बर्वे यांनी आश्वासन दिले की दलित महापुरुषांच्या सन्मानासाठी किंवा बाबू हरदास एल.एन. यांची झालेली उपेक्षा संदर्भात मी लोकसभेमध्ये हा विषय मांडणार. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आरिफ सरमतिया, राजकुमार गेडाम, नगरसेवक आसिफ सरमतिया, प्रफुल साखरे, तुषार दवानी, लक्ष्मण संगेवार, उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.