– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरूवार (ता.7)शोध पथकाने 58 प्रकरणांची नोंद करून 27,000 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी/मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 500 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून रू.700 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणीकचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 1,200 रूपयाची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.![]()
मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर नसणे, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 24 प्रकरणांची नोंद करून 4,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. सेंट्रल पार्क यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. थाली किंग किचन यांनी अनधिकृत भुखंडावर उरलेले अन्न टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मे. देवेंद्र देशमुख यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. मराठा फॅमिली गार्डन यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे च शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. आदीनाथ एंटरप्रायझेस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.वैभव किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे. रिवान रेसीडेंसी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. लेबल्स कल्ब अँड रिसॉर्टस् प्रा.लि. यांनी रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे च शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.55,000 दंड वसुल केला.