spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) नरेंद्र गेडाम यांची महासचिवपदी तर संघटनसचिव पदी सूर्या पेट्रॉस यांची निवड

– अहिल्या नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रिश्चियन सेलचा मेळावा उत्साहात संपन्न

नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रिश्चियन सेलचा महत्त्वपूर्ण मेळावा २२ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन, अहिल्या नगर येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, क्रिश्चियन सेल, बाळासाहेब शंकर साळवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मेळाव्यात महाराष्ट्र क्रिश्चियन सेलसाठी विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार, महाराष्ट्र सरचिटणीसपदी नरेंद्र रामदास गेडाम (नागपूर) यांची तर महाराष्ट्र संघटन सचिवपदी सूर्या प्रभाकर पेट्रॉस (नागपूर) यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार डॉ. निलेश लंके यांनी भूषविले. यावेळी माजी आमदार अशोक बापू पवार तसेच जिल्हाध्यक्ष (अहिल्या नगर) ॲड.संदीप वर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्या दरम्यान विविध पदांसाठी निवड प्रक्रिया देखील पार पडली. याप्रसंगी बिशप तानाजी पाडले, रेव्ह. संजय मिसाळ, रेव्ह. वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खासदार डॉ. निलेश लंके यांनी क्रिश्चियन समाजाला आश्वासन देताना सांगितले की, समाजावर किंवा धर्मगुरूंवर अन्याय अथवा हल्ले झाल्यास ते पूर्ण सहकार्य करतील तसेच समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील. त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, क्रिश्चियन सेल, बाळासाहेब शंकर साळवे यांनी आपल्या भाषणात क्रिश्चियन समाजाच्या प्रश्नांचे निराकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल, असे सांगितले. तसेच भविष्यात धर्मगुरूंवर हल्ले झाल्यास त्यास योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याची दखल शासनाने व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अशी नम्र अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनात पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.