spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अमरावती रोड-दाभा चौक सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाद्वारा प्राप्त विशेष अनुदाना अंतर्गत प्रभाग क्र. १२ अमरावती रोड ते आंतरराष्ट्रीय कृषी कन्वेंशन सेंटर वायुसेना गेट ते दाभा रिंग रोड पर्यंत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात खासदार  माया ईवनाते, आमदार विकास ठाकरे, आमदार डॉ. परिणय फुके, उपमहापौर लिला हाथीबेड, विरोधीपक्ष नेते  संजय महाकाळकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, प्र.अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, एआयएमआयएमचे गट नेते शकील पटेल, मुस्लीन लीगचे गट नेते असलम मुल्ला खान, माजी आमदार  सुधाकर कोहळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती अश्विनी जिचकार, क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शना धवड, धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री देशपांडे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समिती सभापती रुतिका मसराम, नगरसेविका साधना बरडे, नगरसेवक विक्रम ग्वालबंसी, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका योगिता तेलंग, नगरसेविका फुलसु़गे, नगरसेवक योगेश पाचपोर, नगरसेवक  अभिजीत झा, नगरसेवक केतन ठाकरे, विजय होले, वर्षा चौधरी, माजी उपमहापौर संदीप जाधव, मनपाच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, सहाय्यक आयुक्त  राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता मनोज गदरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार  माया ईवनाते म्हणाले की, दाभा परिसरातील नागरिकांची हा सिमेंटचा रस्ता करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. हा सिमेंट रस्ता मंजूर झाल्याने नागरिकांची मागणी पूर्ण होत असल्याचा मला आनंद होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शना धवड यांनी केले. यावेळी त्यांनी अमरावती रोड ते आंतरराष्ट्रीय कृषी कन्वेंशन सेंटर वायुसेना गेट पर्यंत ७३० मी लांबीत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी १ .५० मी रुंदीत फुटपाथ व पावसाळी नालीचे काम अंतर्भूत असून, एकूण १८ मी रुंद रस्ता सिमेंटीकरण करणेकरिता प्रस्तावित असल्याचे सांगितले. प्रकल्पाकरिता ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनोगत व्यक्त करीत सांगितले की, हा रस्ता स्मार्ट रोड म्हणून विकसित होणार आहे. येथे आंतरराष्ट्रीय कृषी कन्वेंशन सेंटर उभारण्यात येत असून, देश विदेशातून लोक येतात, त्यासाठी ये-जा करण्यासासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल.

कार्यक्रमाचे संचालन रिचा सुगंध यांनी केले तर आभार नगरसेवक विक्रम ग्वालबंसी यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.