– संजना मोकरकर ७९.२० % प्रथम, आकाश फाये ७६.६०% व्दितीय, हर्षा नागपुरे ७४.६०% तृतिय, जानवी मानवटकर ७४% चतृर्थ क्रमांक.
कन्हान :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परिक्षा इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर केला असुन यात यशवंत विद्यालय वराडा चा १०० % निकाल लागला असुन संजना मोकरकर हिने ७९.२० % गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
यशवंत विद्यालय वराडा ता पारशिवनी या माध्यमिक शाळेतुन एकुण ३३ विद्यार्थ्यानी इयत्ता बारावीची परिक्षा दिली असुन ३३ ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ०२, ग्रेड १ – २०, ग्रेड २ – ०८, पास ग्रेड ०३ असे एकुण ३३ विद्यार्थी उत्तिर्ण झाले असुन संजना हेमराज मोकरकर हिने ७९.२० % गुण प्राप्त करून यशवंत विद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. व्दितीय आकाश जितेंद्र फाये याला ७६.६० %, तृतिय हर्षा अशोक नागपुरे हिला ७४.६० % गुण, चतृर्थ जानवी अंनता मानवटकर हिला ७४ % गुण, पाचवी पुर्वा ईश्वर टाले हिला ७३. ८० % , सहावी पुजा दिवाकर चौधरी हिला ७२ % , सातवी श्रावणी किशोर फलके हिला ७१.४० % , तर समिक्षा मनोहर दिघडे हिला ७१.२० % गुण प्राप्त करून आठवा क्रमांक पटकाविला आहे. यशवंत विद्यालय वराडा या ग्रामिण भागातील माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वी च्या परिक्षेत १०० % निकाल लागल्याने शाळेचे संचालक भुषणराव निंबाळकर यानी मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका व सर्व विषय शिक्षकांचे तसेच सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.