नागपूर :- 2006 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही मिळू शकते एक इन्क्रिमेंट ॲक्युसॅटच्या नागपूर विभागीय कार्यकारिणीची सभा दिनांक 7 मे 2026 रोजी संपन्न झाली. सभेमध्ये 2006 पासून निवृत्त झालेल्या प्राध्यापक व प्राचार्यांना एक इन्क्रिमेंट मिळू शकते. सेवानिवृत्त प्राध्यापक प्राचार्यांना शेवटचे इन्क्रिमेंट घेतल्यानंतर जर त्याचा सेवाकाळ सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि त्यानंतर ते निवृत्त झाले असेल तर त्यांना एक जादा इन्क्रिमेंट मिळू शकते त्यासाठी त्यांनी ॲक्युसेट या संस्थेकडे आपला प्रस्ताव पाठवायला पाहिजे असे मत सभेमध्ये मांडण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरविंद शेंडे अध्यक्ष नागपूर विभाग हे होते सभेला प्राचार्य प्रभुजी देशपांडे मार्गदर्शक ॲक्युसॅट नागपूर उपस्थित होते. ॲक्यूसॅट कार्यकारीणीचे सहसचिव प्राचार्य डॉ. अशोक काळे व कार्यकारिणीचे सदस्य प्राचार्य डॉ. नरेंद्र दीक्षित प्राचार्य डॉ. पांडुरंग बाळबुधे प्रा.डॉ.रत्नाकर लांजेवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सभेला सुरुवातीला डॉ. पुष्पा तायडे ॲक्युसॅटच्या सचिव यांनी सर्वांचे स्वागत केले. सभेमध्ये सर्व सदस्यांनी आपापली मते मांडली शेवटी अध्यक्ष डॉ. अरविंद शेंडे यांनी या विषयावर कायदेशीर बाजू मांडली कायद्याने लढा दिल्यास एक इन्क्रीमेंट प्राप्त होऊ शकते. यावर सविस्तर विचार मांडले शेवटी डॉ. रत्नाकर लांजेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. असे सचिव डॉ. सौ. पुष्पा तायडे यांनी सांगितले आहे.