spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पिपरा रस्त्याचे काम कासवगतीने

– जड वाहतुकीने टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह; अपघाताची भीती 

बेला :- सोनेगाव बेला सीर्सी या प्रमुख जिल्हा मार्गावर बेला ते पिपरा दरम्यान सिमेंट रस्त्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे.गेल्या दहा-बारा महिन्यांत अवघे सहा कि.मी. अंतराचा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही.वर्दळ, जड वाहतुक व उडणाऱ्या धुळीमुळे सदर रस्त्यावर अपघाताची भीती निर्माण झाली असून असंख्य वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन आवागमन करत आहे.कोळसा व राख वाहतुकीच्या जड वाहनांमुूुळे धूळ उडत असल्यामुळे मानवी डोळ्यांवर संकट निर्माण झाले आहे.

जवळच्या मानस व आयडियल कंपनीत याच रस्त्यावरून मोठमोठे अवजड वाहने कोळसा व राख घेऊन ये जा करतात. जड व अतिभार वाहतूक लक्षात घेता होत असलेला सिमेंट रस्ता निम्न दर्जाचा होत असून या सिमेंट रस्त्याला लवकरच तडे जाईल.अशी नागरिकांकडून भीती व्यक्त होत आहे. सक्षम व टिकाऊ रस्ता होईल.याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.अशी प्रवासी व वाहनचालकांनी मागणी केली आहे. या मार्गावरून असंख्य विद्यार्थी, प्रवासी, शेतकरी व शेकडो वाहनचालक दररोज आवागमन करतात. मोठ्या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी व दुचाकी चालक अक्षरशः त्रस्त झाले आहे.

 अतिभार वाहतुकीवर कारवाई करा

या रस्त्यावरून ओव्हरलोड गाड्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातून रस्त्याची ऐशीतैशी होत असून उडणाऱ्या धुळीने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. क्षमतेपेक्षा जास्त भार घेऊन जाणाऱ्या जड व मोठ्या वाहनांच्या वजनाची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी.अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रतिक्रिया –या रस्त्याने मी दररोज ये जा करतो. वर्दळ, वाहतूक पाहता कामाचा वेग वाढला जाणे गरजेचे आहे. सिमेंट रस्ता बांधकामाच्या दर्जाचीही तपासणी करण्यात यावी. अतिभार वाहतुकीला प्रतिबंध घालावा.प्रवासी,चालकांना धूळ,चिखल व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दर्जेदार व सक्षम सिमेंट रस्ता व्हावा.

संतोष जयस्वाल, शेतकरी सावंगी, बेला.

Popular Articles