spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोदामेंढी जि प हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल 92.75%

किशोर साहू, मौदा :- कोदामेंढी जि प हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल 92.75% लागला. एकूण प्रविष्ठ विद्यार्थी 69 पैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण तर 5 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

वंशिका सचिन मेश्राम या विद्यार्थिनीने 78 % गुण संपादन करून प्रथम क्रमांक, श्रेया नागेश्वर बारई या विद्यार्थिनीने 76.60 % गुण संपादन करून द्वितीय क्रमांक, तर रूपम जगदेव भगत या विद्यार्थ्याने 75.80% गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकाविला.

गुणानुक्रमे आलेल्या तीनही विद्यार्थ्यांचे व उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुरेश ढोके सह समस्त शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी , सदस्यगण व समस्त अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.