spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लोकमान्य विद्यालय, बडेगाव ची यशाची परंपरा कायम

खापा, वार्ताहर :- माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये विद्यालयाचा निकाल ९६.०७ टक्के लागलेला असून यशाची परंपरा कायम राखलेली आहे. परीक्षेमध्ये ५१ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण होण्यात यशस्वी ठरलेले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्य श्रेणीमध्ये २, प्रथम श्रेणीमध्ये १४, द्वितीय श्रेणी मध्ये २९ तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये ४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. विद्यालयातून हिमानी शंकर तुमाने ७९.२० टक्के गुण घेऊन प्रथम आलेली आहे. तसेच द्वितीय क्रमांक खुशी रंजीत बागडे ७६.४०टक्के तर तृतीय क्रमांक श्रुती विलास चापले व कार्तिक बाळा शेंद्रे यांनी ७३. ४० टक्के गुण घेऊन संयुक्तरित्या उत्तीर्ण झालेले आहेत.

विद्यालयातून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे घरी जाऊन मुख्याध्यापक गजानन कुरवाडे शिक्षक नितीन निरगुडे, दिलीप इंगोले यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे सभासद यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयात राबवल्या जाणारे विविध उपक्रम, परिश्रम घेणारे शिक्षक व पालकांना दिले. लोकमान्य शिक्षण संस्था, बडेगावचे अध्यक्ष दिलीप चचाणे, रामराव बट्ठे सचिव, अनिल बागडे उपाध्यक्ष, मनोहर पाल सहसचिव, किशोर बागडे व वीरेंद्र निंबार्ते संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.