spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कर्करोग शिबिराला उत्तम प्रतिसाद

– ६० च्यावर पत्रकारांची आरोग्यतपासणी

नागपूर :- देशात कर्क रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वाढीला अंकुश लावण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे असे आश्वासन नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज रोगनिदान आरोग्य शिबिरात पत्रकारांना दिले.

प्रेस क्लब नागपूर च्यावतीने आज पत्रकार व त्यांच्या कुटुंबाकरीता आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. नागपुरातील नामांकित रुग्णालयांशी संपर्क साधून एक मोठे आरोग्य शिबीर पत्रकारांसाठी आयोजित करू. त्यासाठी मी पुढाकार घेईन असेही ते म्हणाले.

कॅन्सर से जंग जीतेंगे हम पत्रकारों के संग या टँग लाईन अंतर्गत नागपूर प्रेस क्लबच्यावतीने घेण्यात आलेल्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुमारे 60 पत्रकारांनी शिबिरात भाग घेतला. अन् विविध चाचण्या करून घेतल्या. यावेळी पत्रकारांनी रक्तदान केले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली गेली. मुख कर्करोग, स्तन कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, आणि श्वसन संदर्भात कर्करोगाची तपासणी केली. तसेच दंत, नेत्र, हाड मजबूती व स्त्रीरोग तपासणी केली. कर्करोगा प्रती जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. पत्रकार व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, या सोबतच शिबिर संयोजक अब्दुल गफूर पाशा तथा कॅन्सर केअर फाउंडेशनचे शाकिर रजा खान, डॉ. प्रशांत ढोके, भूपेंद्र गणवीर, महेश उपदेव, विवेक पुराडभट, चंद्रकांत शेंडे, रणजीत देशमुख, शामकांत पात्रीकर, मंगेश व्यवहारे , लोकमतचे जितेंद्र ढवळे यांच्यासह इतरही पत्रकारांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.