– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६
कन्हान :- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्य ३०० व्या जयंती निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ अंतर्गत पेंच पाटबंधारे विभाग टेकाडी २ अंतर्गत लाभ क्षेत्रातील समस्त पाणी वापर संस्था व्दारे संवाद व कार्यशाळा संपन्न करण्यात आली.
पेंच पाटबंधारे विभाग टेकाडी २ अंतर्गत लाभ क्षेत्रातील समस्त पाणी वापर संस्था व्दारे संवाद व कार्यशाळेचे मुकुंद डांगे उपविभागीय अभियंता टेकाडी यांचे हस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून करण्यात आले. यावेळी दिपक गौर शाखा अभियंता टेकाडी २, तुळशीराम काळमेघ लेखा परिक्षक नागपुर, भंडारा जिल्हा व समस्त पाणी वापर संस्था यांचे तर्फे दिप प्रज्वलन आणि पुष्प अर्पण करण्यात आले. विचारपीठा वरील मान्यवरांचे स्वागत सर्व पाणी वापर संस्था अध्यक्ष/सचिव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमा चे अध्यक्ष मुकुंद डांगे उपविभागीय अभियंता टेकाडी यांनी शेतकरी व पा वा संस्था यांना आधुनिक जल नियोजन, पाण्याचा कार्यक्षम वापर, शेती आणि पिक नियोजनाबाबद मार्गदर्शन केले. दिपक गौर शाखा अभियंता टेकाडी २, यांनी पाणी वापर संस्था सक्षमीकरण या विषयावर अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले.![]()
तुळशीराम काळमेघ लेखा परिक्षक नागपुर, भंडारा जिल्हा यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन प्रसंगावर आणि अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान, कामगिरी, अनेक मंदिराच्या आश्रयदात्या असुन जल व्यवस्थापन व पाणी वापर संस्थाचे कार्याबद्दल सर्वांना समजावुन सांगितले. समस्त पाणी वापर संस्था तर्फे कांद्री किसान पाणी वापर संस्थाचे सचिव जयराम मेहरकुळे यांनी पेंच पाटबंधारे विभाग टेकाडी सिंचन शेतकऱ्यां कडुन व्यवस्थापन, प्रभावी अंमलबजावणी व त्या अंतर्गत स्थापन झाले ल्या पा वा संस्थांच्या अडी अडचणीचे निराकरण करून त्यांना प्रभावी कार्यक्षम करण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश मस्के, श्रीराम नांदुरकर व समस्त पाणी वापर संस्था यांनी केले. प्रास्तविक श्रीराम नांदुरकर व सूत्र संचालन रविंद्र चकोले तर आभार शिवाजी चकोले यानी व्यकत केले. पेंच पाटबंधारे विभाग टेकाडी २ चे सेवानिवृत कर्मचारी गिऱ्हे, सोनकुसरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गुणवंत ठाकरे दप्तर लिपिक, सुजित कुंभमवार दप्तर लिपिक उपस्थित होते. श्याम बावनकुळे, दुर्योधन ठाकरे, मनोहर सरोदे, मधुकर बंड, तुळशीराम बालकोटे, नरेंद्र ठाकरे, सुखदेव पानतावणे, अनिल सोनसरे, ईश्वर सोनसरे, श्रावण बरबटकर, दशरथ सोनसरे, कवडु सराटकार, पिंटु मोखारे, हरिश वैद्य, लोकेश महादुले, पुंडलिक वानखेडे आदीनी कार्यक्रम यशस्वितेकरिता सहकार्य केले.