spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीएमश्री न.प. राजेंद्र हायस्कूलचा ९२.५१ टक्के निकाल

खापा, वार्ताहर :- नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नगर परिषद खापा द्वारा संचालीत पीएमश्री न.प. राजेंद्र हायस्कूल, खापा विद्यालयाचा निकाल ९२.५१ टक्के लागला. असून यंदाही शाळेने निकालाची दमदार परंपरा कायम राखली. विद्यालयातील एकूण १८७ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. यापैकी १७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचे ३७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५१ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत, तर २७ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.

वैभव मोरेश्वर बडवाईक ९० टक्के गुणांसह शाळेतून प्रथम, , मंथन विजय खंडाळे ८९.२० टक्के गुणांसह व्दितीय, निधी संजय दाते ८८.२० टक्के गुणांसह तृतीय, सोनाक्षी प्रकाश राऊत ८८ टक्के गुणांसह चतुर्थ, तेजस्विनी जगन्नाथ पटले ८७.८० टक्के गुणांसह पाचवा येण्याचा मान मिळविला.

नगराध्यक्ष पियुष बुरडे, उपाध्यक्ष सुनिल पाहुणे, शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे, न.प. खापा मुख्याधिकारी सचिन राऊत, मुख्याध्यापक सुनिल नेहारे, पर्यवेक्षक शामराव खडसे, शिक्षण समिती सदस्य गणेश आके, नगरसेवक निखिल आष्टनकर, रवि परतेकी, पुष्पेंद्र शर्मा यांच्या सह आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक समिती सर्व सदस्य, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी सर्व विद्याथ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.